आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर महापालिकेच्या चार नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार नगरसेवकांनी गुरूवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अपक्ष नगरसेवक पोपट बारस्कर, इंदरकौर गंभीर, गिरजाबाई उडाणशिवे व समाजवादी पार्टीचे अय्यूब शेख यांचा यात समावेश आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी भवनात झालेल्या या प्रवेश सोहळ्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी मनपा निवडणुकीसाठी पक्ष बांधणीला वेग दिला आहे. पक्षात प्रवेश केलेल्या या चारही नगरसेवकांची राष्ट्रवादीशी जवळीक होती. त्यामुळे त्यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. यापूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक दशरथ शिंदे व दीपक खैरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता चार विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आणखी काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे जगताप यांनी सांगितले. प्रवेश सोहळ्यास राष्ट्रवादीचे नगरसेवक आरिफ शेख, दत्ता सप्रे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अफजल शेख, दिलीप पवार, विजय गव्हाळे आदी उपस्थित होते.