आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवक बोराटे, मुदस्सर शेख यांच्या विरोधात नोंदवली साक्ष, दोन्ही नगरसेवकांवर दोष निश्चिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश पाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे काँग्रेसचे मुदस्सर शेख यांच्याविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी दाेघांवरही दोष निश्चिती करून त्यांच्याविरोधात साक्षीदारांची तपासणी केली. त्यामुळे या दोन्ही नगरसेवकांच्या पदांवर टांगती तलवार आहे. विभागीय आयुक्तांनी मंगळवारी साक्षीदारांची तपासणी करून उलट तपासणीसाठी २८ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे.

जून २०१५ रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत बोराटे शेख हे पक्षादेश पाळता सभेस गैरहजर राहिले. त्यामुळे बोराटे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते समद खान यांनी, तर शेख यांच्या विरोधात काँग्रेसचे तत्कालीन गटनेते संदीप कोतकर यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या कार्यवाहीस स्थगिती मिळावी, यासाठी बोराटे यांनी आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आयुक्तांच्या कार्यवाहीवरील स्थगिती उठवत ४५ दिवसांत तक्रार निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी बोराटे शेख यांच्या विरोधातील तक्रार अर्जाबाबत १५ नोव्हेंबरला पहिली सुनावणी घेतली. त्यानंतर २१ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत विभागीय आयुक्त कार्यालयाने बोराटे शेख यांच्याविरोधात दोषनिश्चिती केली. त्यानंतर २२ नोव्हेंबरला दोघांच्या विरोधात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यात राष्ट्रवादीचे नूतन गटनेते संपत बारस्कर काँग्रेसच्या नूतन गटनेत्या सुवर्णा काेतकर यांचे अधिकारपत्रधारक नगरसेवक सुनील कोतकर यांनी विभागीय आयुक्तांसमोर उपस्थित राहून आपली साक्ष नोंदवली. अन्य साक्षीदार पक्षादेश बजावताना उपस्थित असलेले पंच, छायाचित्रकार, तसेच टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या नोंदवण्याबाबत अर्ज सादर करण्यात आला. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी साक्षीदारांच्या उलट तपासणीसाठी २८ नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने अॅड. प्रसन्ना जोशी यांनी बाजू मांडली.

बोराटे यांची मागणी फेटाळली
नगरसेवकबोराटे यांनी विभागीय आयुक्तांसमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीत नगरसेवक समद खान हेच आपले गटनेते असल्याचे सांगितले. परंतु विभागीय आयुक्तांनी बोराटे यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे बोराटे यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शेख बोराटे दोघांच्या पदावर टांगती तलवार निर्माण झाल्याने विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...