आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Municipal Corporation Bjp Canvasing At Maliwada

अहमदनगरात भाजपच्या प्रचाराला प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतीय जनता पक्षाने माळीवाडा वेस येथे माजी शहराध्यक्ष गुलशन जग्गी यांच्या हस्ते नारळ वाढवून मनपा निवडणूक प्रचाराला मंगळवारी प्रारंभ केला. नंतर ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात आरती करण्यात आली.
खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे, शहराध्यक्ष अभय आगरकर, आमदार शिवाजी कर्डिले, शिवाजी लोंढे, शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी, गीता गिल्डा, सुरेखा जंगम, कालिंदी केसकर, विशाखा पटेल, जसपाल पंजाबी, गीतांजली काळे आदी यावेळी उपस्थित होते. 2 डिसेंबरपासून भाजपच्या प्रचाराला प्रारंभ होणार होता. परंतु सोमवती अमावस्येमुळे प्रचार एक दिवस लांबणीवर पडला.

युती तुटलेली नाही : ढाकणे
शिवसेना-भाजपची युती तुटलेली नाही. महापालिका निवडणुकीतील युतीच्या प्रचाराला आज, उद्या सुरुवात होईल, असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. आमदार कर्डिले म्हणाले, कुठल्या प्रभागात कोणत्या उमेदवार द्यायचा हा आमचा प्रश्न आहे. ते सांगणारे तुम्ही कोण? आम्ही त्यांच्या उमेदवारांवर आक्षेप घेतला का? कुणाला उमेदवारी द्यायची याचे सर्व अधिकार प्रदेशने पंच कमेटीला दिले आहेत. भाजपवर घेतलेला आक्षेप चुकीचा आहे. मी राष्ट्रवादीत होतो तेव्हा राष्ट्रवादीचा महापौर करण्यासाठी कुणी मदत केली हे मला ठाऊक आहे. ते सांगण्याची गरज आहे का, असा टोला कर्डिले यांनी आमदार राठोड यांचे नाव न घेता लगावला.