आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ahmednagar Municipal Corporation Dr. Rajurkar Bail Granted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. राजूरकरांसह 8 जणांना जामीन; चंदा भुकन मृत्यू प्रकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा दाखवून चंदा भुकन या महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. सतीश राजूरकर यांच्यासह आठ जणांना जिल्हा न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वानखडे यांनी सोमवारी हा निर्णय दिला.
सारसनगर परिसरात राहणार्‍या चंदा भुकन या महिलेचा मनपाच्या देशपांडे रुग्णालयात 5 जुलैला मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेचे पती सुभाष भुकन यांनी 1 ऑगस्टला न्यायालयात फिर्याद दिली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे शस्त्रक्रिया करताना चंदा यांची शीर कापली गेली. त्यामुळे पोटात रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला, ही माहिती डॉक्टर व कर्मचार्‍यांनी लपवून ठेवून फसवणूक केली. चूक लपवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली. या सर्वांनी कट केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला.
न्यायालयाने रुग्णालयातील डॉ. वृषाली प्रभास पाटील, शिल्पा र्शीकांत पाठक, कांचन सुरेंद्र रच्चा, कृष्णा तुलसीदास कलवाणी, परिचारिका योगिनी सदानंद वायकर, संगीता ज्ञानदेव नाचन, राधिका लक्ष्मण घुले, प्रयोगशाळा चालक वंदना शिरोडे आणि डॉ. राजूरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश शनिवारी दिला. यापैकी शिरोडे वगळता इतर आठजणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या वतीने अँड. के. एम. देशपांडे, अँड. अभिजित देशपांडे, अँड. एम. डी. भालेराव व अँड. बी. टी. पाटील यांनी बाजू मांडली. तपासादरम्यान पोलिस बोलावतील तेव्हा तपासात सहकार्य करणे, पुरावे गोळा करताना हस्तक्षेप न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे या व इतर अटींवर न्यायालयाने डॉ. राजूरकर यांच्यासह इतर आठ आरोपींना 13 ऑगस्टपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.