आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Municipal Corporation Election Congress Vs Shivsena

काँग्रेससमोर सेना पडली एकाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महिला राखीव जागेवर सुवर्णा कोतकर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या सुनीता कोतकर व अपक्ष उमेदवार संगीता कातोरे रिंगणात उतरल्या आहेत. कोतकर यांचा झंझावात पाहून हे दोन्ही उमेदवार हतबल झाले आहेत. माजी महापौर संदीप कोतकर यांना जिल्हाबंदी आहे, तरीदेखील त्यांचा बालेकिल्ला असलेल्या केडगावातील सात जागा काँग्रेसकडे ठेवण्यात त्यांना यश मिळाले. जिल्हाबंदीमुळे संदीप कोतकर यांनी प्रचाराची सर्व सूत्रे पत्नी सुवर्णा यांच्याकडे सोपवली आहेत. त्या स्वत:च्या प्रभागासह इतर प्रभागांतील उमेदवारांसाठीही प्रचार करत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या संगीता कातोरे यांचा निभाव लागेल का?, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सुनीलकुमार कोतकर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे रामदास येवले, तसेच मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रतीक बारसे व सोहन (संभाजी) सातपुते यांचे आव्हान आहे. येवले यांनी मागील निवडणुकीत अर्ज भरला होता, परंतु तो बाद झाला होता. त्यामुळे यावेळी त्यांनी जोर लावला आहे. केडगावचे माजी सरपंच म्हणून त्यांची ओळख असली, तरी त्यांचा काँग्रेस उमेदवारासमोर निभाव लागणार नाही, अशी चर्चा आहे. अपक्ष उमेदवार बारसे यांनी मात्र जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांना मागील निवडणुकीतही चांगली मते मिळाली होती. त्यामुळे सुनीलकुमार कोतकर व बारसे यांच्यात सरळ लढत होणार आहे.
.. तर ‘त्यांना’ जाहीर पाठिंबा
विद्यमान नगरसेवकांनी स्वत: केलेले एखादे विकासकाम दाखवले, तर त्यांना जाहीर पाठिंबा देईन. ते पाच वर्षांत प्रभागात फिरकले नाहीत. त्यामुळे अनेक नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. अंतर्गत रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळेच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. नागरिक मोठय़ा मताधिक्याने निवडून देतील, याची खात्री आहे.
- सुनीता संजय कोतकर, उमेदवार, शिवसेना.
नागरिकांचा माझ्यावर विश्वास
प्रभागात माझा मोठा जनसंपर्क आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होणार आहे. पाच वर्षे नागरिकांसाठी अनेक विकासकामे केली. जास्तीत जास्त वेळ प्रभागासाठी दिला. काही कामे प्रलंबित आहेत. तीदेखील लवकरच पूर्ण होतील. नागरिकांच्या विश्वासामुळेच पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलो आहे. प्रभागातील नागरिक काँग्रेसलाच मतदान करतील, याची खात्री आहे.
- सुनीलकुमार सज्रेराव कोतकर, नगरसेवक, काँग्रेस.