आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Municipal Corporation School , Student, Teacher

महापालिका शाळांमधील बाराशे विद्यार्थ्यांसाठी फक्त 33 शिक्षक!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: महापालिकेच्या शाळांमधील 1200 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ 33 शिक्षक आहेत. शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याने या शाळांमधील पटसंख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. एकीकडे खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले असताना मनपा शाळांना मात्र विद्यार्थ्यांची उणीव भासत आहे.
शिक्षकांची अपुरी संख्या, ढासळलेली गुणवत्ता यामुळे विद्यार्थी व पालकांनी मनपा शाळांकडे पाठ फिरवली आहे. पटसंख्या दर वर्षी कमी होत आहे. मनपाच्या शहरात 11 शाळा असून त्यापैकी रेल्वेस्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व सावेडीतील महात्मा ज्योतिबा फुले या दोन शाळांमध्येच पुरेशी पटसंख्या आहे. इतर 9 शाळा केवळ नावालाच उरल्या आहेत. शिक्षक व मनपा शिक्षण मंडळाकडून पटसंख्या वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. शासननिर्णयानुसार 1 ली ते 7 वीपर्यंत 210 विद्यार्थ्यांमागे मुख्याध्यापक व 7 शिक्षक व 1 ली ते 4 थीपर्यंत 150 विद्यार्थ्यांमागे मुख्याध्यापक व 4 शिक्षक असणे बंधनकारक आहे. मात्र, पुरेशी पटसंख्या नसल्यामुळे शिक्षकांची संख्याही र्मयादितच आहे. मनपाने पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले, तर शिक्षकांची संख्याही वाढेल, पण गेल्या तीन वर्षांपासून त्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. विद्यार्थी मिळत नसल्याने मनपा शाळांच्या इमारती खासगी शाळांना भाडेतत्त्वावर देण्याची नामुष्की मनपावर आली आहे.