आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

480 घरकुलांची योजना मार्गी लागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केंद्र शासनाच्या एकात्मिक शहर व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या घरकुल योजनेसाठी शासनाकडून 4 कोटी 82 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे 480 घरकुलांची ही योजना लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर शीला शिंदे यांनी दिली.
सन 2009 मध्ये मनपाने 480 घरकुलांचा प्रस्ताव ‘म्हाडा’कडे सादर केला होता. त्यासाठी 10 कोटी 52 लाखांचा खर्च अपेक्षित होता. काही त्रुटींमुळे या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे मनपाने 2010-11 च्या दरसूचीनुसार सुमारे 13 कोटींचा सुधारित प्रस्ताव तयार करून तो पुन्हा ‘म्हाडा’कडे सादर केला होता. त्यास मंजुरी मिळावी, यासाठी महापौर शिंदे यांनी प्रयत्न केले. ‘म्हाडा’चे उपमुख्य अभियंता अजित बनकर यांच्यासमवेत 11 नोव्हेंबर 2011 रोजी मनपात बैठक घेऊन योजना मार्गी लागावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने या योजनेसाठी 4 कोटी 82 लाखांचा निधी नुकताच मनपाच्या खात्यावर जमा केला आहे. याबाबत माहिती देताना महापौर म्हणाल्या, ही घरकुल योजना लवकर मार्गी लावण्यात येणार आहे.
मनपाच्या संजयनगर येथील 1.75 एकर जागेवर ही घरकुले बांधण्यात येणार आहे. सुरुवातीला 228 घरकुले बांधण्यात येणार असून संजयनगरच्या झोपडपट्टीवासीयांना ती देण्यात येणार आहेत. नालेगाव येथील दोन एकर जागेत 252 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या ठिकाणी शहरातील चार झोपडपट्टय़ांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येईल. मुंबई येथील ‘म्हाडा’च्या अधिकार्‍यांनी संबंधित जागेची पाहणी करून तसा प्रस्ताव ‘हुडको’ला सादर केला होता. हुडकोने त्यास तांत्रिक मान्यता दिली.