आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात नव्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. २७ एप्रिल ते १२ मे अखेर प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून २८ मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक प्राध्यापक एन. बी. मिसाळ यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दहा महिने विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. गुणांच्या आधारावर मुलाखती घेऊन साठ विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार असल्याचे प्रा. मिसाळ यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...