आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Municipal Election Latest News In Divya Marathi

मनसेचे डागवाले,बोज्जा सभापतिपदासाठी रेसमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-महापालिकेच्या मंगळवारी (4 मार्च) होणार्‍या विशेष सभेत स्थायी समिती, तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतींची निवड होणार आहे. त्यासाठी मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले यांच्यासह नगरसेविका वीणा बोज्जा यांनी ‘फिलिंडग’ लावली आहे. डागवाले यांनी स्थायीच्या सभापतिपदासाठी, तर बोज्जा यांनी महिला व बालकल्याण समिती सभापतीसह उपसभापतिपदासाठी शनिवारी अर्ज नेले.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणार्‍या विशेष सभेत स्थायी सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती-उपसभापतिपदांची निवड होणार आहे. या पदांसाठी उमेदवारी अर्जांची विक्री व स्वीकृती शुक्रवारपासून (28 फेब्रुवारी) नगरसचिव कार्यालयात सुरू आहे. पहिल्या दिवशी स्थायी सभापतिपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता कांबळे व अपक्ष नगरसेविका उषा ठाणगे यांच्यासाठी अर्ज नेण्यात आले. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी अपक्ष नगरसेविका नसीम शेख यांनी, शनिवारी स्थायी सभापतिपदासाठी डागवाले, तसेच महिला बालकल्याण समिती सभापतीसह उपसभापतिपदासाठी बोज्जा यांनी अर्ज नेले. त्यामुळे या पदांसाठी चुरशीची लढाई होणार आहे. अर्ज विक्री व स्वीकृतीची शेवटची मुदत सोमवारी (3 मार्च) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे.