आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा कदम, तर उपमहापौरपदी भाजपचे छिंदम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- अहमदनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा संभाजी कदम तर उपमहापौरपदी भाजपचे श्रीपाद छिंदम यांची निवड झाली आहे. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी एनसीपीला सोबत घेऊन महानगर आघाडी केली होती. मात्र, या आघाडीचा धुव्वा उडाला आहे.
- महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या राजकारणाला ऐनवेळी कलाटणी मिळाल्‍याचे नगरमध्‍ये पाहायला मिळत आहे.
- महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपचा 1 गट या महानगर विकास आघाडीच्या नंदा साठे यांनी ऐनवेळी माघार घेतली.
- शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार दिलीप गांधी यांच्या गटाची मदत घेतली होती.
- उपमहापौर पदाच्या निवडीच्यावेळी पुन्हा भाजपच्या दोन गटांत खडाजंगी पाहायला मिळाली. आधी दत्ता कावरे हे माघार घ्‍यायला तयार नव्हते. पण नंतर मात्र, त्यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे गांधी गटाचे छिंदम बिनविरोध उपमहापौर झाले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...