आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या तिजोरीत 27 कोटींचा कर जमा, शास्तीमाफी दिल्याने झाली चार कोटींची वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका प्रशासनाने शास्तीमाफी दिल्यानंतर अवघी चार कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. एप्रिल २०१४ ते आजअखेर एकूण २७ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. शास्तीमाफीची मुदत ३१ जानेवारीला संपणार आहे, त्यानंतर प्रशासनाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. चालू अार्थिक वर्षात समाधानकारक वसुली न झाल्यास मनपासमोर अार्थिक प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होणार आहे.
महापालिका प्रशासनाने ३१ मार्च १०१४ पूर्वीच्या थकबाकीदारांची ७५, तर चालू अार्थिक वर्षातील थकबाकीदारांची शंभर टक्के शास्ती माफ केली. एका महिन्यासाठी सवलत देण्यात आली होती, आता दोन दिवसांनी ही मुदत संपणार आहे. तरीदेखील थकबाकीदार पैसे भरण्यासाठी पुढे आले नाहीत. शास्तीमाफी दिल्यानंतर अवघी चार कोटी रुपयांची थकबाकी वसुल झाली. थकबाकीदारांच्या साेयीसाठी प्रशासनाने सुटीच्या दिवशी देखील वसुली कार्यालये सुरू ठेवली. सवलतीचा लाभ घेत जास्तीत जास्त थकबाकीदारांनी पैसे भरावेत, या उद्देशाने शास्तीमाफी देण्यात आली होती. परंतु प्रशासनाचा हा उद्देश सफल झाला नाही. त्यामुळे आता शास्तीमाफीची मुदत संपताच जप्ती मोहीम सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अर्थिक वर्ष संपत आले, तरी १३२ कोटींच्या थकबाकीपैकी केवळ २७ कोटी ३२ लाख रुपयांची वसुली झाली. उर्वरित थकबाकीच्या वसुलीसाठी प्रशासनाकडे अवघे दोन महिने (३१ मार्चपर्यंत) उरले आहेत. थकबाकीच्या एकूण रकमेपैकी ४२ कोटी ७९ लाख रुपयांची शास्तीची रक्कम आहे, ही रक्कम आज ना उद्या माफ होईल, त्यानंतरच थकबाकी भरू, असा पवित्रा थकबाकीदारांनी घेतला होता. आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेकांनी देखील शंभर टक्के शास्ती माफ करावी, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी शास्तीमाफी दिली. मात्र, थकबाकीदारांनी त्यास म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत अजूनही खडखडाट आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होणार आहे.

विकासकामांवर परिणाम
चालू अर्थिक वर्षात जमा-खर्चाचा ताळमेळ बसवताना मनपा प्रशासनाच्या नाकीनव आले आहेत. पारगमन ठेक्यातून दरमहा मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बंद झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगारासाठी देखील मनपाकडे पैसे नाहीत. एलबीटी व मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न समाधानकारक नसल्याने मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी अनेक विकासकामे रखडली आहेत. िबले मिळत नसल्याने ठेकेदारही काम करण्यास तयार नाहीत.
गाळेधारक रडारवर
शहरात महापालिकेच्या मालकीचे सुमारे ८७० गाळे आहेत, हे गाळे भाडेकरारावर देण्यात आलेले आहेत. मात्र, अनेक गाळेधारकांचा करारनामा संपला आहे. त्यांनी मनपाकडे गाळेभाडे भरलेले नाही. त्यात रंगभवन व प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळेधारकांचा समावेश आहे. हे गाळे सील करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

विकासकामांवर परिणाम
चालू अर्थिक वर्षात जमा-खर्चाचा ताळमेळ बसवताना मनपा प्रशासनाच्या नाकीनव आले आहेत. पारगमन ठेक्यातून दरमहा मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बंद झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगारासाठी देखील मनपाकडे पैसे नाहीत. एलबीटी व मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न समाधानकारक नसल्याने मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी अनेक विकासकामे रखडली आहेत. िबले मिळत नसल्याने ठेकेदारही काम करण्यास तयार नाहीत.

एका दिवसात कोटी जमा
शास्तीमाफीची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी मनपाच्या प्रभाग कार्यालयांमध्ये पैसे भरण्यास गर्दी केली आहे. बुधवारी (२८ जानेवारी) दिवसभरात तब्बल एक कोटी रुपयांची थकबाकी जमा झाली. त्यात सावेडी प्रभाग समिती कार्यालयात सर्वात जास्त ३५ लाख रुपयांची थकबाकी जमा झाली. आता उर्वरित दोन दिवसांत थकबाकीदारांडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.