अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील एका गतीमंद मुलीवर 53 वर्षीय नराधमाने आज दुपारी बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणानंतर वारंवार बलात्काराच्या अशा घटना समोर येत असल्याने महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यात भीषण बनला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरून गेला होता.
- दिवसेंदिवस मराठा समाजबांधवांच्या विशाल मोर्चांमधून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे.
- अशात पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
- मोहरी गावात दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
- मोहरी हे गाव पाथर्डीपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.
- पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून शेजारील 53 वर्षीय नराधम घरात घुसला.
- त्याने तिच्यावर बलात्कार केला.
- मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
- गावक-यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
- या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.