आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar, Rayat Shikshan Sanstha President Adv. Raosaheb Shinde

शास्त्रज्ञ घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर- अँड. शिंदे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: चांगले शास्त्रज्ञ घडवून देश शक्तिशाली बनवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. रावसाहेब शिंदे यांनी केले.
रयत सेवक व रयत शिक्षण संस्थेच्या विद्यमाने आयोजित कृतज्ञता सोहळा नुकताच यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झाला. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नंतर ‘रयत शिक्षण संस्थेपुढील 21 व्या शतकातील आव्हाने’ या विषयावर अँड. शिंदे यांचे भाषण झाले. भागीरथ शिंदे, अरुण कडू, शिवाजीराव भोर, एन. एस. सोनवणे, विजय नलगे, महेश पाटील, अरविंद बुरंगुले आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, मरगळलेल्या समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी कर्मवीर भाऊरावांनी ही संस्था उभी केली. आता शिक्षणाचे संदर्भ बदलले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाने समाजात क्रांती घडवली आहे. ‘रयत’ला या शिखरावर न्यायचे असेल, तर गुणवत्ता टिकवली पाहिजे. संधीचे सोने करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे. देश घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे.
प्रास्ताविक शिवाजी भोर यांनी केले. सूत्रसंचालन शर्मिला पाठक यांनी, तर आभार प्रदर्शन काकासाहेब वाळुंजकर यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.