आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमनगरात स्कूल बसची चाके निखळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वर्का स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजच्या स्कूल बसची (एमएच 20 डब्ल्यू 9294) मागची चाके निखळण्याचा प्रकार शुक्रवारी स्टेशन रस्त्यावर अक्षता गार्डनसमोर घडला. दुपारी सव्वादोनच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. अरणगाव येथील वर्का स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसची डाव्या बाजूची दोन चाके बस सुरू असताना निखळून पडली. या प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी बस थांबताच बाहेर धाव घेतली. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. घटना समजताच प्राचार्य डॉ. रॉमिन आले. ‘किरकोळ अपघात आहे, आमच्यासाठी हे रोजचेच आहे?’ असे बसचालक लोकांना म्हणत होता.