आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जि. प. सदस्यांचे 96 टक्के मतदान; आज मतमोजणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा नियोजन समितीच्या दहा जागांसाठी बारा उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतपेटीत बंद झाले. जिल्हा परिषदेच्या 75 पैकी 72 सदस्यांनी, तर शिर्डी नगरपंचायतीच्या 17 पैकी 14 सदस्यांनी मतदान केले. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.

नियोजन समितीच्या 36 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेतून 24 व नगरपालिकांमधून 2 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 10 जागांसाठी मतदान झाले. जि. प. सर्वसाधारण प्रवर्गाच्या 9 सदस्यांसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत. शिर्डी नगरपंचायत सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांमध्ये लढत झाली. जि. प. च्या 9 जागांसाठी अशोक मधुकर आहुजा (शेवगाव), विश्वनाथ यादवराव कोरडे (जवळा), बाबासाहेब रामभाऊ तांबे (गोरेगाव), संभाजी सदाशिव दहातोंडे (चांदा), बाबासाहेब देवराम दिघे (र्शीरामपूर), शरद मोहनराव नवले (बेलापूर), राजेंद्र आनंदराव फाळके (कर्जत), अण्णासाहेब सीताराम शेलार (बेलवंडी), दत्तात्रेय शहाजी सदाफुले (चिचोंडी पाटील), बाळासाहेब रघुनाथ हराळ (गुंडेगाव) रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 75 पैकी 72 जि. प. सदस्यांनी मतदानात भाग घेतला.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवणारे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य राजेंद्र फाळके यांनी मतदानच केले नाही. अंजली काकडे व बाजीराव दराडे हे जिल्हा परिषद सदस्य मतदानासाठी आले नाहीत.