आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Zilha Parishad Teachers Transfer Issue

अहमदनगर जिल्हा परिषदेतील 53 शिक्षकांच्या बदल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बदल्यांचा हंगाम सुरू असल्याने जिल्हा परिषदेला सध्या यात्रेचे स्वरूप आले आहे. गुरूवारी शिक्षण विभागातील 53 जणांच्या बदल्या झाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया झाली.

आदिवासी भागातून प्राधान्याने 20 शिक्षकांच्या इतर तालुक्यांत बदल्या करण्यात आल्या. अकोले तालुक्यात इतर तालुक्यांतून सुमारे 33 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या बदल्यांचा हंगाम सुरू असल्यामुळे सकाळपासून कर्मचार्‍यांनी गर्दी केली होती. प्रशासकीय बदल्या करण्यापूर्वी प्रथम ‘नेस्सा’ नियमांतर्गत आदिवासी भागात अधिक काळ काम करणार्‍या कर्मचार्‍यांना बदलीत प्राधान्य देण्यात आले आहे. नंतर इतर बदल्या होतील.