आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनीता गायकवाड यांच्या प्रचारार्थ अजित पवार उद्या श्रीरामपुरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता गायकवाड यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सोमवारी (६ ऑक्टोबर) येथील थत्ते मैदानावर जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी दिली. तालुक्यात प्रथमच महिला उमेदवारास संधी मिळाली असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
सोमवारी होणाऱ्या सभेस जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, मधुकर पिचड, घनश्याम शेलार, लाल पटेल, महिला आघाडीच्या काशिबाई डावखर, अजय डाकले, अच्युतराव बडाख, शहर महिला अध्यक्ष अर्चना पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत. या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन अजित कदम यांनी केले आहे.