आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Drama : Opposition Sounding Means Politics ; Say Gurdian Minister

अजित पवार नाट्य : विरोधकांचा आरडाओरडा म्हणजे राजकारण ; पालकमंत्र्यांचा पलटवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या चुकीबद्दल आधीच माफी मागितली आहे. एखाद्याने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याला मोठय़ा मनाने माफ करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे, पण माफी मागूनही कोणी आरडाओरडा करीत असेल, तर ते ‘राजकारण’ आहे, असा पलटवार पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी रविवारी केला. जिल्ह्यातील टंचाई उपाययोजनांची कामे उघडपणे सुरू असल्याचा खुलासाही त्यांनी केला.

शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवारांची उचलबांगडी करावी, अशी मागणी केली होती. त्याला रविवारी पाचपुते यांनी उत्तर दिले. जिल्ह्यातील टंचाई आढावा बैठका लोकप्रतिनिधींना व पत्रकारांना डावलून घेतल्या जातात, असा आरोपही मुंडे यांनी केला होता. त्यालाही पाचपुते यांनी उत्तर दिले. जिल्ह्यातील खासदार, आमदार, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आम्ही बैठका घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आतापर्यंत घेतलेल्या 41 आढावा बैठका सर्वांसाठी खुल्या होत्या. त्यामुळे मुंडेंच्या आरोपात तथ्य नाही, असे पाचपुते म्हणाले.