आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव मोठे, मी तर लहान माणूस; अजितदादांचा टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विरोधी पक्षाचे नेते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी प्रश्नांवर आरोप करतील. पण आम्ही आमचे काम करतो, ही आमची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरेंसारख्या मोठय़ा माणसाबद्दल माझ्यासारख्या लहान नेत्याने बोलणे उचित ठरणार नाही, अशा भाषेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली. दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यासाठी पवार रविवारी आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काय बोलावे हा विरोधकांचा अधिकार आहे. आम्ही आमचे काम करतो. सरकार जनतेच्या पाठीशी आहे, हे कृतीतून दिसावे. एलबीटीचा निर्णय सर्वांशी चर्चा करून झाला आहे. व्यापार्‍यांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. प्रकरण फक्त ताणले गेले आहे, यावर एकत्र बसून निश्चित मार्ग निघू शकेल, असेही पवार म्हणाले.