आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, Ajit Pawar Rally At Nagar, Divya Marathi

कामगारांचे प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध : पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कष्टकरी, सुरक्षा रक्षक, विडी कामगार यांच्यासाठी आघाडी शासन अनेक योजना राबवत आहे. या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले.
हमाल पंचायतमधील सुरक्षा रक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष शंकरराव घुले, पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार बबनराव पाचपुते, अरूण जगताप, चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, राजीव राजळे, अंकुश काकडे, महापौर संग्राम जगताप आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, कष्टकरी कामगारांचे अनेक प्रश्‍न असतात. काही ठिकाणी त्यांची पिळवणूक होते. त्यांना लवकर न्याय मिळत नाही. अशा प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आघाडी शासन कटिबद्ध आहे. विडी कामगार, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. वैद्यकीय सुविधा, मुलांना शिक्षण, विमा संरक्षण अशा अनेक योजना आहेत, पण त्या गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत. योजनांच्या कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. यात पारदर्शकता आली पाहिजे. प्रत्येक गरजूला योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे.