आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, Ajit Pawar Visit To Nagar District , Divya Marathi

अजित पवार यांची मंगळवारी श्रीरामपूर, कर्जतला प्रचार सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. काही दिवसांपूर्वी शेवगावला पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे मंगळवारी (1 एप्रिल) श्रीरामपूर व कर्जत येथे होणार्‍या सभांना कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गारपीट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्या वेळी पवार यांच्याविरोधात शेवगावात घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवले होते. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नगरला सभा झाली. पण ही सभा शांततेत झाली. मात्र, पवार शेवगावनंतर पुन्हा प्रचारानिमित्त कर्जत व श्रीरामपूरला येत आहेत, त्यामुळे या सभेत शेवगावप्रमाणे घोषणाबाजी होणार काय, याकडे लक्ष लागून आहे. सकाळी अकरा वाजता काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरापूर येथील प्रगतीनगर भागात, तर राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारार्थ कर्जतला महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. या वेळी पालकमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, शंकरराव कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत