आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, Deputy Chief Minister, Divya Marathi, Nagar

उपमुख्यमंत्री पवार यांचे चित्त ‘पायतणा’कडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘देव देवळात अन् चित्त पायतणात’ या म्हणीचा प्रत्यय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृतीतून सध्या येत आहे. सभेच्या व्यासपीठावर पोहोचताच ते गादीचा कोपरा स्वत: वर करून आपली चप्पल त्याखाली सारतात. चप्पलचोरांवर मात करण्यासाठी पवार यांनी ही नामी युक्ती शोधली आहे.


आघाडीच्या प्रचारासाठी पवार यांनी जिल्ह्यात अनेक दौरे केले. मोदी लाटेचा परिणाम व प्रतिष्ठेची केलेली निवडणूक यामुळे पवार कुटुंबीय मतदारांना साद घालण्यात कोणतीही कसर सोडत नव्हते. पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ मनमाड रस्त्यावरील संजोग लॉनवर फोडण्यात आला. या कार्यक्रमात त्यांची चप्पल चोरीला गेली. खूप शोधाशोध करूनही ती सापडली नाही. तेव्हापासून चोरट्यांचा धसका घेतलेल्या पवार यांनी नामी युक्ती शोधून काढली. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर त्यांनी तीनदा जिल्ह्याचा दौरा केला. प्रत्येकवेळी त्यांनी स्वत:च्या चपलेची काळजी घेतली. व्यासपीठावर येताच ते कोपर्‍यातील गादीचा कोना उचलतात आणि चप्पल त्याखाली सरकवतात. त्यानंतर उपस्थितांना अभिवादन करत स्थानापन्न होतात. चप्पल चोरांना शह देण्यासाठी नामी युक्ती शोधणारे पवार कुरघोड्या करणार्‍या पक्षांतर्गत पदाधिकार्‍यांवर कोणता डाव टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.