आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, R.R. Patil, Jitendra Awhad, Lok Sabha Election

अजित पवार, आर. आर., आव्हाड आज जिल्ह्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. आर. पाटील आणि जितेंद्र आव्हाड रविवारी (13 एप्रिल) एका दिवसांत तब्बल आठ सभा घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिली.
पवार रविवारी सकाळी साडेनऊ वाजता, निघोज, पारनेर येथे साडेअकराला जामखेडला सभा घेणार आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांची सकाळी अकरा वाजता राशीन (ता. कर्जत) येथे, दुपारी 1 वाजता वांबोरी (ता. राहुरी) येथे सभा होईल. राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड दुपारी 3 वाजता जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सभा घेऊन, सायंकाळी सहा वाजता नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे जाहीर सभा घेणार आहेत.

रात्री 8 वाजता नगर शहरातील मुकुंदनगर भागात आव्हाड जाहीर सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार रात्री 8 वाजता नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभांसाठी पालकमंत्री मधुकर पिचड, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आदींसह सर्व आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, महापौर, उपमहापौर व त्या-त्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत यांनी दिली.