आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफी नकोच, अजित पवारांना जागा दाखवाः गोपीनाथ मुंडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राज्य दुष्काळाने होरपळत असताना सत्ताधा-यांच्या तोंडी घाणेरडे उद्गार शोभत नाहीत. त्यामुळे त्यांना (अजित पवार) माफी नकोच, असे स्पष्ट मत भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनीही पवारांच्या वक्तव्याबद्दल जाहीर क्षमा मागावी व अशा बेजबाबदार मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. उ

उपमुख्यमंत्र्यांना असे बोलणे शोभत नाही. सत्तेची मुजोरी अद्यापही कायम आहे. अजित पवारांनी माफी मागितली असून आमचे सर्व आमदार त्यांच्या पाठीशी आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड म्हणतात. पण, त्यांना कोण विचारतो. ते एवढे प्रभावी असते, तर त्यांना मंत्रीपद मिळाले नसते का, अशा शब्दात मुंडेंनी पिचड यांचीही खिल्ली उडवली. पुतण्यासाठी काकांनी तिस-यांदा माफी मागितली. आता या वयात त्यांना तरी किती वेळा माफी मागायला लावणार? या गोष्टीची पुतण्याला नसली तरी आता मलाच लाज वाटते, अशी टीकाही मुंडे यांनी केली.


वीजबिल, कर्जमाफी द्या
राज्यात शिरपूर पॅटर्नची अंमलबजावणी करावी, पाझर तलावांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन जून महिन्यापर्यंतचा आढावा सादर करावा, चारा तगाईचा शासनादेश रद्द करावा, शेतकºयांची पूर्णपणे वीजबिल व कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.