आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लांडे खूनप्रकरण: संदीप कोतकरच्या अर्जावर सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणी जामिनासाठी असलेली जिल्हाबंदीची अट शिथिल करण्याची मागणी करणार्‍या माजी महापौर संदीप कोतकरच्या अर्जावर बुधवारी (28 ऑगस्ट) सुनावणी होईल. जिल्हा न्यायाधीश बी. यू. देबडवार यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

लांडे खूनप्रकरणी न्यायाधीश देबडवार यांच्यासमोर मंगळवारी नियमित सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान कोतकरच्या वतीने जिल्हाबंदीची अट शिथिल करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला. महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. प्रभागातील काही कामे अपूर्ण आहेत. या कामांचा पाठपुरावा करायचा असल्याने अट शिथिल करण्याची मागणी या अर्जात करण्यात आली आहे. तसेच या अर्जावर नियमित सुनावणीच्या दिवशी सुनावणी घेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली. ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने या अर्जावर बुधवारी सुनावणी ठेवली.

आरोपी सुनील भोंडवे याच्या वतीने दोषारोपपत्रातून वगळण्याची मागणी करणारा अर्ज करण्यात आला. सुरुवातीला नोंदवलेल्या गुन्ह्यात नाव नसल्याने दोषारोपपत्रातून नाव वगळण्याची मागणी भोंडवेच्या वतीने करण्यात आली. या अर्जावरही बुधवारी सुनावणी होईल.