Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | akole development project politics

श्रेय लाटण्यावरून राष्ट्रवादी-युतीत जुंपली

प्रतिनिधी | Update - Oct 21, 2011, 09:00 AM IST

तालुक्यातील विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या कामाचे श्रेय लाटण्यावरून राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपच्या कार्यक्रमात चांगलीच जुंपली आहे.

 • akole development project politics

  अकोले - तालुक्यातील विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या कामाचे श्रेय लाटण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपच्या कार्यक्रमात चांगलीच जुंपली आहे.
  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार होते. मात्र कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकावर सेना - भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी केली. कार्यक्रम रद्द न झाल्यास विकास कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे पिचड यांना काळे फासण्याचा इशारा सेना - भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिला. तर बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी 22 ऑक्टोबरला नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या वतीने हे कार्यक्रम 21 ऑक्टोबरपूर्वीच पार पाडले जातील व त्यांची भूमिपूजने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात येतील. अहमदनगर जिल्हा नियोजन समिती व केंद्र सरकारच्या डी.आर.जी.एफ. निधी, सर्व शिक्षा अभियान योजनेचा निधी, तीर्थक्षेत्र विकास योजनेचा निधी आदी मंजूर झालेल्या अनेक विकास कामांच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम 22 रोजी अकोल्यात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिकाही वितरीत करण्यात आल्या होत्या, मात्र या पत्रिकेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना समान स्थान देण्यात न आल्याने कार्यक्रमपत्रिका वादाच्या भोवऱयात सापडली. ही पत्रिका शासकीय कामांच्या भूमिपुजनाची असल्याने त्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा नामोल्लेख असणे गरजेचे होते. प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रणपत्रिका तयार केली नसल्याने त्यावर शिवसेना - भाजपाच्या पदाधिकाऱयांनी आक्षेप घेतला. निमंत्रणपत्रिकेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱयांचाच उल्लेख असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पिचड यांच्या पक्षाचाच तो राजकीय कार्यक्रम ठरला होता. पत्रिकेत पिचड यांच्या हस्ते व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सीताराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. या निमंत्रित कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती मंगला जाधव, युवा नेते वैभव पिचड, अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, सुरेखा मेंगाळ, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरीजाजी जाधव उपस्थित राहणार होते. निमंत्रण पत्रिकेची बाब लक्षात येताच शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी 18 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग अधिकारी यांना याबाबत फैलावर धरले. या नंतर सेना - भाजप कार्यकर्त्यांनी अकोल्यातील पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. या मागणीनंतर 22 तारखेचे अकोल्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
  राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड हे आपण कोणत्याही परिसरात व पाठपुरावा घेऊन मंजूर न केलेल्या विकास कामांचे खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. तालुक्याच्या विकास कामाकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष व आपली निष्क्रियता दाखवण्यासाठीच खासदार वाकचौरे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या केंद्रीय निधीतून होणारे विकास कामांचे भूमिपूजन करीत नारळ फोडीत सुटले आहेत हे त्यांचे लबाडीचे राजकारण आहे.’’
  दशरथ सावंत, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना
  अकोल्यात आ. पिचड यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आ. पिचड यांना कार्यक्रमाला येण्यासाठी वेळ नसल्याने हे कार्यक्रम रद्द करण्यात आले. ’’
  चिंतामण धोत्रे, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम

Trending