आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Receive Rashtrapati Award News In Marathi

अस्थिव्यंगावर मात करत अक्षयने गाठली हिमालयाची उंची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शारीरिक अपंगत्वाचा बाऊ करता "त्याने' कुंचल्यावर लक्ष्य केंद्रित केले. "त्याच्या' या दुर्दम्य इच्छाशक्तीला आईनेही तितकीच भरभक्कम साथ दिली. याच बळावर साडेतीन फुटाच्या अक्षय वैद्यने राष्ट्रपती पुरस्काराला गवसणी घालत हिमालयाची उंची गाठली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्याला प्रदान करण्यात आला.
जन्मत:च अस्थिव्यंगाचा दोष असलेला अक्षय ितसऱ्या इयत्तेपासून चित्रांमध्ये रमायला लागला. अपंगत्वाचा बाऊ करता तो कुंचल्याच्या जगात लीलया वावरू लागला. स्थानिक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये मिळालेली विविध पारितोषिके त्याचा उत्साह द्विगुणित करणारी ठरली. मुंबईच्या बालनुक्कड स्पर्धेत विशेष कलाभूषण, विलेपार्लेच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, पिंपरी-चिंचवड स्पर्धेत कलाभूषण पुरस्कार, वन कृषी विभागाच्या स्पर्धांमध्ये अव्वल स्थान, अशी विविध शिखरे त्याने पादाक्रांत केली. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाने त्याला यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करून पुरस्काराचीही उंची वाढवली. राज्यातून या पुरस्कारासाठी निवड झालेल्या तिघांमध्ये अक्षयचा समावेश आहे. राष्ट्रपती मुखर्जी यांनी सुवर्णपदक, प्रशस्तिपत्रक ५० हजारांचा धनादेश देऊन अक्षयचा गौरव केला.
आईच्या भरभक्कम पाठबळासोबतच रिक्षाचालक असलेल्या वडिलांचा आधार अक्षयला मिळाला. अपंगत्व स्पर्धांच्या निमित्त होणारा प्रवासात येणाऱ्या अडचणीत आई सुषमा यांनी त्याला साथ दिली.अक्षयमधील आत्मविश्वासाला त्यांनी कायम ऊर्जा दिली. त्यामुळेच अक्षयने पुरस्काराचे सर्व श्रेय आईला दिले आहे. बलराज येलूलकर यांनीही सहकार्य केल्याचे अक्षयने म्हटले आहे. तो रूपीबाई बोरा कॉलेजमध्ये अकरावी कला शाखेत शिकत आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे हेमंत विटणकर यांचेही त्याला मार्गदर्शन मिळते. किरण डहाळे यांचा पुढाकार आकार ग्रूपच्या साह्याने २०१३ मध्ये रावसाहेब पटवर्धन स्मारकात अक्षयच्या ८० निवडक चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. अक्षयचा जिल्हा प्रशासनाने सत्कार करावा, अशी अपेक्षा डहाळे यांनी व्यक्त केली आहे.
सर्वांचे सहकार्य प्रेमामुळे शक्य
-अक्षयची अंगभूत चिकाटी त्याला चित्रकलेच्या क्षेत्रात प्रगती करण्यात मोलाची ठरली आहे. या चिकाटीसाेबतच त्याच्यावर प्रेम सहकार्य करणारे स्नेही यांच्यामुळे अक्षय आम्ही पालक त्याच्या अस्थिव्यंगावर मात करू शकलाे आहोत. या पुरस्कारातून त्याला आणखी बळ मिळाल्याचा आनंद आहे.'' सुषमासुनील वैद्य, अक्षयचीआई.