आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्यतृतीयेला 15 कोटींची उलाढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोमवारी सोने व वाहन बाजारात सुमारे 15 कोटींची उलाढाल झाली.

सोन्याच्या भावात मोठय़ा प्रमाणात घसरण झाल्याने अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर अनेकांनी सोन्यात गुंतवणूक केली. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, तसेच जमीन खरेदी करणे व नवीन वास्तूत प्रवेश करणे शुभ मानले जाते. विविध कंपन्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदीही मोठय़ा प्रमाणात झाली.

दुष्काळामुळे सध्या फारसा उत्साह नसला, तरी सोमवारी सराफ बाजारात गर्दी झाली होती. नेकलेस, राणीहार, मंगळसूत्र, ब्रेसलेट, मोहनमाळ, अंगठय़ा आदी प्रकारांना मागणी होती. सर्वांत जास्त मागणी फॅन्सी दागिन्यांना होती. सोन्याच्या भावात एप्रिलमध्ये मोठी घसरण झाली. सोने 26 हजारांपर्यंत खाली आले होते. रविवारी (12 मे) सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 27 हजार 800 रुपये होता. सोमवारी 200 रुपयांनी घसरण होऊन भाव 27 हजार 600 रुपयांवर आला. अनेकांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केली. सोने, वाहन, नवीन घरे, जमीन अशा व्यवहारांत सोमवारी सुमारे 15 कोटींची उलाढाल झाली, असा अंदाज आहे.

चांदी 46 हजार 500 रुपये किलो
सोमवारी चांदीचा भाव 46 हजार 500 रुपये किलो होता. तीन वर्षांपूर्वी चांदीचा भाव 75 हजारांवर गेल्यामुळे ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात चांदीत गुंतवणूक केली होती. मात्र, त्यानंतर भावात सातत्याने घसरण होत गेली.

सराफांचा अपेक्षाभंग
अक्षय्यतृतीयेला सराफ बाजारात 7 कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज होता. मात्र, दुष्काळामुळे सोन्याची केवळ 20 टक्के म्हणजे अडीच कोटींची उलाढाल होऊ शकली. त्यामुळे सराफ व्यावसायिकांचा अपेक्षाभंग झाला.’’ संतोष वर्मा, अध्यक्ष, सराफ असोसिएशन.