नगर - भिंगारमधीलआलमगीर परिसरातील एका इमारतीच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्या बाराजणांना कॅम्प पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून सुमारे हजार ३५० रुपये जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. नागरदेवळे शिवारात कवडे शाळेच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या पाठीमागे ओढ्यालगत हा जुगार अड्डा सुरु होता.
राजू भाऊराव पवार (४१, नेहरु कॉलनी, भिंगार), नितीन अशोक शिर्के (३०, सोनसाळे गल्ली), इब्राहम हनिफ बागवान (२८, पाटील गल्ली), कलीम अब्बास शेख (३५, मोमीनपुरा), कैलास बन्सी परदेशी (६०, शुक्रवार बाजार), नीलेश लक्ष्मण वाघमारे (२८, इंदिरानगर), रमेश शुभ्रमण्यम नायडू (५४, आलमगीर), राहुल प्रकाश औटी (३०, ब्राह्मणगल्ली), वसीम लतीफ बेग (२५, शनिमंदिर), सचिन मुकुंद बागूल (२७, बेरड गल्ली), बशीर गुलाब शेख (३०, मोमीनगल्ली), रमेश रामचंद्र लोंढे (६०, ब्राह्मणगल्ली सर्व भिंगार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून रोख हजार ५० रुपये, तसेच जुगाराची साधने जप्त करण्यात आली. उपनिरीक्षक गुठ्ठे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी मुंबई जुगार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला अाहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बी. जी. काळे करत आहेत.
मध्यंतरी कमी झालेले जुगाराचे प्रमाण आता पुन्हा वाढले आहे. नगर शहरात काही ठिकाणी जुगार अड्डे सुरू आहेत. या अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.