आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीेला ग्रामीण भागात बळकटी हवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात दारूचा महापूर आला आहे. हातभट्टीपासून देशी, विदेशी आणि वाईनपर्यंतचे पर्याय दारुबाजांसाठी खुले आहेत. शहरात आणि खेडोपोडी काही प्रमाणात लपून-छपून तर बहुतेक ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारुगुत्ते खुलेआम चालू आहेत. दिवसभर कष्ट करून हाती येणाऱ्या पैशांतून कुटुंबाच्या पोटापाण्याची सोय करण्याआधी दारुगुत्त्यावरून तर्र होऊन घराकडे परतणा ऱ्या मदिराभक्तांना तोटा नाही. सरकारी दारुबंदीचा प्रयत्न तर केवळ देखावा ठरला आहे. पण, असे असूनही काही समविचारी संघटना दारुबंदी चळवळीत जोमाने काम करत आहेत.
कर्जत तालुक्यातील मोठी बाजारपेठ मोठी लोकसंख्या असलेल्या चापडगाव येथील राजकीय पुढारी गावातील युवकांनी एकत्र येत दारुबंदी करण्याचा निर्धार केला. निवडणुकांच्या काळात संवेदनशील समजल्या जाणा ऱ्या या गावात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी सर्व राजकीय पुढारी गावक ऱ्यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. आता त्यच राजकीय संघटनांचा फायदा घेत विकासाचे पहिले पाऊल म्हणून दारुबंदीचा निर्धार करण्यात आला आहे. चापडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य नागेश घनवट, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष अॅड. बाळासाहेब शिंदे, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे, चापडगाव सुधार समितीचे अॅड. विकास शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

शासनमान्य दारुची दुकाने, हॉटेल ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात कायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने विकल्या जात असलेल्या दारुमुळे गावातील सामाजिक वातावरण दूषित झालेले आहे. शाळा काॅलेजात शिकणारे तरुण दारुच्या आहारी गेल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेकायदेशीर दारुची विक्री होत असतानाही प्रशासनाकडून डोळेझाक होत आहे. युवकच नशेच्या आहारी गेल्यामुळे खूप वर्षांपासून गावचा विकास खुंटला आहे. यापूर्वीही दारुची विक्री बंद व्हावी म्हणून अनेकदा प्रयत्न झाले. पण, राजकीय गटतटांमुळे त्याला यश आले नाही. दारुबंदी संदर्भात जनजागृती, प्रबोधन व्हावे, यासाठी शासनाच्या नशाबंदी मंडळाच्या राज्याच्या सचिव वर्षा विद्या विलास राज्य संघटक अमोल मडामे यांचा व्याख्यानपर मार्गदर्शनाचा कार्यक्रम चापडगावातील लोकांसाठी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमालाही सर्वपक्षीय मंडळींनी ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला, अशी माहिती चापडगाव सुधार समितीचे अॅड. विकास शिंदे यांनी दिली.

दारूचा महापूर आटणार कधी?
सध्याचीतरुणपिढी मोठ्या प्रमाणावर दारुच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. तरुणच नव्हे, तर शालेय मुलेही मद्यपी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पुण्यातील चिल्लरपार्टी हे त्याचेच उदाहरण आहे. काही स्वयंसेवी संस्थांच्या सर्वेक्षणानुसार दारू प्यायला सुरू होण्याचे वय २७ वरून १७ वर आले आहे. आता तर हे वय १४ पर्यंत घसरत आहे. मध्यंतरी तर शासनाने १२ लीटरपर्यंत दारू बाळगण्यास परवानगी देण्याचा मानस व्यक्त केला होता. यावरुन शासन कोणता आदर्श संस्कार घालून देण्याच्या विचारात आहे, हा गंभीर सवाल आहे.

आकडेवारी
३३ लाख दारूमुळे होणारे मृत्यू
१४ कोटी कुटुंब दारूमुळे उद‌्ध्वस्त
४०% गुन्ह्यांचे कारण दारूच
३५% अपघात दारू पिल्यामुळे
५५ % कौटुंबिक हिंसाचार दारूमुळे
९०% महिलांवर अत्याचार करणारे आरोपी मद्यपी