आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यविक्रीवर असणार सीसीटीव्हीचा वॉच, मद्यविक्रीची नोंद ठेवण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- निवडणुकीच्या कालावधीत होणाऱ्या मद्यविक्रीवर निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. जिल्ह्यातील सर्व ठोक मद्यविक्री करणा-या व्यावसायिकांना गोदामामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना आयोगाने दिली आहे. त्याचबरोबर या कालावधीत होणाऱ्या मद्यविक्रीची नोंद ठेवण्याचेही आदेशही आयोगाने दिले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना पैशांचे किंवा मद्याचे आमिष दाखवले जाते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ठोक मद्य विक्रेत्यांसाठीही आचारसंहिता घालून देत गोदामामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या कालावधीत किती मद्य येते, किती विक्री होते, कुठल्या दुकानात किती मद्य जाते याची नोंदही सीसीटीव्हीमध्ये होणार आहे.
नगर जिल्ह्यात विदेशी मद्याची ११ व देशी मद्याची ८ गोदामे आहेत. या गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. कॅमरे बसवण्यात आले आहेत िकंवा नाही, याची तपासणी स्वत: उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. निवडणुकीच्या कालावधीत मद्याची मागणी वाढते. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व मद्यविक्री दुकानदारांना विक्रीच्या नोंदी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मद्याच्या वाहतुकीवर लक्ष
परराज्यांतून अनधिकृतपणे येणा-या मद्यावर लक्ष ठेवण्यासाठी विधानसभा मतदारसंघांत पथके स्थापन करण्यात आली आहेत. एकूण ३६ जणांचे हे पथक असून, त्यात पोलिस, महसूल, तसेच उत्पादन शुल्क कर्मचा-यांचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघात तीन तपासणी नाके आहेत. प्रमुख रस्त्यांवर पथके वाहनांची तपासणी करणार आहेत. सुनील माळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.