आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ambila Mahila Bank President Pro. Pushpatai Markad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर: अंबिका महिला बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. मरकड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अंबिका महिला बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. पुष्पाताई मोहनराव मरकड व उपाध्यक्षपदी प्रा. मेधाताई यशवंत काळे यांची बिनविरोध निवड झाली.
नवे पदाधिकारी निवडण्यासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेच्या अध्यक्षस्थानी आशा दिलीप मिस्किन होत्या. अध्यक्षपदासाठी प्रा. मरकड यांच्या नावाची सूचना प्रा. संध्या जाधव यांनी केली. त्यास शांता मोरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी प्रा. काळे यांच्या नावाची सूचना प्रा. पुष्पलता वाघ यांनी केली, तर अनुमोदन सरोजिनी चव्हाण यांनी दिले. बँकेच्या ठेवी 40 कोटी, कर्जवाटप 26 कोटी, गुंतवणूक 17 कोटी व भागभांडवल 75 लाख झाल्याचे प्रा. काळे यांनी सांगितले. सभासदांना 13 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. शाखा विस्तार, कोअर बँकिंग, कर्मचारी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान या संदर्भात प्रयत्नशील असल्याचे प्रा. मरकड यांनी सांगितले.