आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोल बागूलचे नाव मंगळावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अमेरिकेतील "नासा' अवकाश संशोधन संस्थेने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या आेरियन अवकाशयानात विज्ञान अभ्यासकांच्या नावाचा समावेश असलेल्या मायक्रोचिपमध्ये नगर येथील उपक्रमशील शिक्षक कलावंत अमोल बागूल यांच्या नावाचा समावेश झाला आहे. त्यांच्या रुपाने नगरचे नाव मंगळावर पोहोचले आहे.

"जर्नी टू मार्स' या उपक्रमांतर्गत नासाने हे अवकाशयान मंगळ ग्रहावर पाठवले आहे. प्रशिक्षक अभ्यास गटातून बागूल यांनी सोलर सायकल्स संकल्पनेवर आधारित सोलर ड्रेस, सोलर पेंट, सोलर रुफ, सोलर प्लॅटफॉर्म असे पाच प्रकल्प सादर केले होते. यातील सहभाग म्हणून बागूल यांना आेरियन अवकाश यानाचा बोर्डिंग पास नासाने पाठवला आहे. जगभरातील २३० देशांतील १३ लाख ७९ हजार ९६१ अभ्यासकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

नासाने नाण्याएवढ्या आकारातील मायक्रोचिपमध्ये या अभ्यासकांची लाखो नावे विज्ञान जनजागृतीपर मंगळ ग्रहावर पाठवली आहेत. मानवरहित अंतराळ क्रू मॉड्यूल - अोरियन हे यान डिसेंबर २०१४ रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडातील कॅनेडी अंतराळ केंद्रावर डेल्टा -४ हेव्ही या रॉकेटमधून मंगळ मोहिमेसाठी रवाना झाले आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व अभ्यासकांची नावे नासाकडे सुरक्षित राहणार आहेत. अमेरिकेतील लाख ६३ हजार ६६९ अभ्यासकांनी, तर भारतातील लाख ७८ हजार १४४ अभ्यासकांनी या मोहिमेसाठी आपले प्रकल्प पाठवले होते. मोहिमेसाठी जगाचे पाठबळ मिळावे, या हेतूने विज्ञान अभ्यासकांच्या संकल्पना, प्रकल्प, नावीन्यपूर्ण संशोधन जगाच्या कानाकोपऱ्यातून नासाकडे म्हणजेच जगासमोर यावीत, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली.

प्रेरणा मिळाली
नासाच्याया पारितोषिकामुळे मला पुढील उपक्रमांसाठी प्रोत्साहन मिळाले. वैज्ञानिक खेळातून विज्ञान हा प्रकल्प नासाच्या मार्गदर्शनानुसार प्रगतिपथावर आहे. आपण ज्या समाजातून आलो, त्यासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा यातून मिळाली.'' डॉ.अमोल बागूल, शिक्षक.
बातम्या आणखी आहेत...