आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amrapurkar Memorial Award Declared To Poet Saumitra

स्व. अमरापूरकर स्मृती पुरस्कार कवी सौमित्र यांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्याचे रहिवासी कवी अभिनेते किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांना 'स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार' देण्यात येणार असल्याची माहिती शेवगाव नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर, कार्यवाह मफिज इनामदार, उपाध्यक्ष भगवान राऊत यांनी दिली.
अभिनेता संवेदनशील कार्यकर्ता अशी ओळख असलेले स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दहा हजार रुपये स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या वेळी सुनंदा अमरापूरकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी परिषदेचे गणेश चेके, रमेश भारदे, रामेश्वर धूत,बबन म्हस्के आदी प्रयत्नशील आहेत. स्व. अमरापूरकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शेवगाव नाट्य परिषद शाखेतर्फे मंगळवारी (३ नोव्हेंबर) अमरापूरकर यांच्या 'ज्याचा-त्याचा विठोबा' या नाटकातील काही प्रवेश सादर केले जाणार आहेत.