आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैं तुझे फिर मिलूंगी, कहाँ किस तरह पता नही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - फाळणी व विफल प्रेमातून आयुष्यात आलेल्या वादळाचे प्रतिबिंब कवितांमधून मांडणार्‍या ख्यातनाम हिंदी साहित्यिका अमृता प्रीतम यांच्या कवितांनी नगरकरांना रविवारी सायंकाळी मंत्रमुग्ध केले.

‘‘मैं तुझे फिर मिलूंगी, कहाँ किस तरह पता नही, शायद तेरे तसव्वुर की चिंगारी बनकर, तेरे कॅनव्हास पे उतरुंगी..’’अमृताच्या कवितेतील या ओळींचा अनुभव नगरकरांना घेता आला. निमित्त होते रसिक ग्रुपच्या वतीने रावसाहेब पटवर्धन स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या ‘झरा अमृताचा’ या कार्यक्रमाचे. अमृता यांच्या कविता सादर करताना त्यांचा जीवनपटही उलगडण्यात आला. पुण्याच्या गीतांजली जोशी यांचे लेखन व संध्या देवरुखकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. विनिता चोपडा-गुंदेचा, डॉ. अमित त्रिभुवन, र्शुती विश्वकर्मा हे ओघवत्या भाषेत अमृता प्रीतम यांचा जीवनपट रसिकांसमोर मांडत असतानाच गीतांजली जोशी कविता सादर करत होत्या.

फाळणीआधी लाहोरला असताना साहिरशी झालेली मानसिक गुंतागुंत. तो वेगळ्या धर्माचा असल्याने कुटुंबीयांच्या दबावाखाली प्रीतम सिंहशी केलेला विवाह. त्यानंतर झालेली देशाची फाळणी व लाहोरहून दिल्लीला स्थलांतर. प्रीतम सिंगशी घटस्फोट, मात्र साहिरची जोडीदार बनण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा.. असे अमृता प्रीतम यांच्या जीवनातील विविध पैलू रसिकांसमोर अलगद उलगडत गेले. स्वागत रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी केले.