आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटीबाबतची बैठक निष्फळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहर बसवाहतूक सेवेबाबत (एएमटी) जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी झालेली बैठक निष्फळ ठरली. 1 जुलैपासून सेवा बंद करण्याच्या निर्णयावर ठेकेदार संस्था ठाम आहे. दरम्यान, ठेकेदार प्रसन्न पर्पलच्या मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तातडीने सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर शीला शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ते बैठकीत एएमटीबाबत चर्चा झाली. यावेळी महापौर शिंदे, पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, उपअधीक्षक विजय पवार, आरटीओ विलास कांबळे, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, प्रसन्ना पर्पलचे महाव्यवस्थापक निखिल वैद्य, रणधीर देशमुख, दीपक मगर आदी उपस्थित होते. तोटा भरून काढण्यासाठी मनपाने दरमहा 10 लाख रुपये अनुदान द्यावे, या ठेकेदाराच्या मागणीबाबत बोलताना उपायुक्त डोईफोडे म्हणाले, करारनाम्यात अशी तरतूद नाही. सर्वसाधारण सभेत हा विषय घेता येईल.

अवैध वाहतुकीबाबत उदासीनता
केवळ अवैध वाहतुकीच्या मुद्दयावर सेवा बंद करणे हा मूर्खपणा आहे, अशा शब्दांत डॉ. संजीवकुमार यांनी ठेकेदाराला सुनावले. अधीक्षक शिंदे म्हणाले, प्रशासन चांगले की वाईट हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? करारनाम्यात अवैध वाहतूक रोखण्याचा मुद्दाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.