आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटीला जागा देण्यास एसटी अनुकूल : महापौर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहर बससेवेसाठी (एएमटी) जागा देण्यास राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी अनुकूलता दाखवली आहे, अशी माहिती महापौर शीला शिंदे यांनी बुधवारी दिली. दरम्यान, एएमटीला येणार्‍या अडचणींबाबत गुरुवारी दुपारी स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून शहर बससेवा सुरू राहावी, यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माळीवाडा बसस्थानकातील मागील जागा एएमटीला देण्याबाबत मनपाचे पदाधिकारी व अधिकार्‍यांची मुंबई येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयात कपूर यांच्यासमवेत बुधवारी बैठक झाली.

यावेळी उपायुक्त स्मिता झगडे, सभागृह नेते अशोक बडे, नगरसेवक संभाजी कदम, विजय बोरुडे, अनिल शिंदे, परिमल निकम आदी उपस्थित होते. बसस्थानकाच्या मागील जागा देण्यास कपूर यांनी अनुकूलता दाखवली. लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, एएमटीच्या सेवेत येणार्‍या अडचणींबाबत गुरुवारी स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली आहे. सभेत जागा भाड्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.