आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एएमटी बंद; सत्ताधा-यांनो खुर्ची सोडा :राठोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर बससेवा (एएमटी) बंद पाडणा-या महापालिकेतील सत्ताधा-यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. युतीच्या काळात नागरिकांचे हित लक्षात घेऊन एएमटी ठेकेदाराच्या अडचणींवर योग्य तोडगा काढण्यात आला, परंतु सध्या सत्तेवर असलेल्यांना बससेवा सुरू ठेवण्यात अपयश आले, अशी टीका आमदार अनिल राठोड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असून त्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करू, असे त्यांनी सांगितले.
गेल्या चार दिवसांपासून शहर बससेवा बंद असल्याने हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राठोड यांनी सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, युतीच्या काळात बससेवा बंद होण्याचा प्रसंग निर्माण झाला होता, परंतु आम्ही नागरिकांचे हित लक्षात घेऊन ठेकेदाराची बैठक घेऊन अडचणी दूर केल्या. सध्याच्या सत्ताधा-यांना ठेकेदाराच्या अडचणी सोडवण्यात अपयश आले. सत्ताधा-यांनी या प्रश्नावर सकारात्मक तोडगा न काढता नागरिकांना वा-यावर सोडून केवळ करारनामा व कायद्यावरच चर्चा केली. कायदे नागरिकांच्या सोयीसाठी असतात, गैरसोयीसाठी नव्हे. जर करारनाम्यात नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसेल, तर हा करारनामा महासभेच्या मंजुरीने बदलता येत नाही का? असा प्रश्न आमदार राठोड यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.