आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एएमटी’चा प्रवास 1 रुपयाने महागणार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शासनाने एसटी प्रवासी भाडेवाढीबाबत जे निकष ठरवले आहेत, त्याप्रमाणे शहर बससेवेची (एएमटी) भाडेवाढ करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. एएमटीच्या भाड्यात आता सरसकट एका रुपयाने वाढ होणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या या विषयाला स्थायीने वेगवेगळी कारणे दाखून दोनदा स्थगिती दिली होती. सभापती अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या सभेत प्रशासनाने भाडेवाढीबाबतची कारणे व आवश्यकता याबाबत परिपूर्ण प्रस्ताव ठेवला. राज्य शासन एसटी महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीबाबत जे निकष ठरवते, त्यानुसार एएमटीला भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. एएमटीच्या 10 किलोमीटरच्या आतील भाड्यात 1 रुपया, तर 10 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासभाड्यात 2 रुपये वाढ करावी, असा प्रस्ताव ठेकेदार कंपनी प्रसन्ना पर्पलकडून देण्यात आला होता. मात्र, स्थायीने एसटीच्या निकषाप्रमाणे 32 किलोमीटरपर्यंतच्या भाड्यात एका रुपया वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही भाडेवाढ कंपनीला मान्य होईल का, हा प्रश्न आहे.
बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात बालरोग तज्ज्ञांची कंत्राटी करारानुसार 6 ऐवजी 11 महिन्यांसाठी नेमणूक करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. सर्जेपुरा येथील प्रियदर्शनी इमारतीमधील हॉल आरटीओ कार्यालयास भाडेतत्त्वावर देण्यासह इतर विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
असे असतील तिकीट दर - शाहूनगर ते विळदघाट-पूर्वी 17 आता 18, आलमगीर ते निंबळक -पूर्वी 15 आता 16, सीबीएस ते निंबळक -पूर्वी 12 आता 13, सीबीएस ते शिवाजीनगर -पूर्वी 7 आता 8.
32 किलोमीटरचा निकष चुकीचा - भाडेवाढीचा निर्णय झाला, पण अद्याप ठराव मिळाला नाही. स्थायी समितीने 32 किलोमीटरपर्यंत एक रुपया भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. परंतु ते एसटी महामंडळाच्या निकषामध्ये येत नाही. महामंडळाच्या निकषाप्रमाणेच भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता.
दीपक मगर, एएमटी व्यवस्थापक.