आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anand Vidyalaya Inquary Report Submit : Order By Education Officer

आनंद विद्यालयाबाबत चौकशीचा अहवाल सादर करण्याचा शिक्षणाधिका-यांचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गुलमोहोर रस्त्यावरील आनंद विद्यालयावर प्रशासक नेमणुकीसाठी शिक्षणाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश देण्यापूर्वीच उपशिक्षणाधिकारी जी. जी. सय्यद यांनी चौकशी अहवाल तयार केला. याप्रकरणी खुलासा सादर करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी देऊनही सय्यद यांनी अद्यापि खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी स्मरणपत्र देऊन खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वैद्यकीय अधिकार्‍याची स्वाक्षरी व अपंगत्वाची टक्केवारी नमूद असलेली विद्यार्थ्यांची कोरी अपंग प्रमाणपत्रे आनंद विद्यालयात आढळून आली होती. याप्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले होते.

मात्र, यामागे संस्थेच्या व्यवस्थापनाचा वाद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी मुख्याध्यापिकेला पुन्हा कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्या. शाळेवर प्रशासक नेमण्याबाबत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश उपशिक्षणाधिकारी सय्यद यांना 21 डिसेंबर 2012 रोजी देण्यात आले. जानेवारी 2013 मध्ये अहवाल तयार झाला. तथापि, त्यात 11 डिसेंबर 2012 रोजी चौकशी करून अहवाल तयार केल्याचे म्हटले होते.