आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् त्या मातांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्नेहालय हे प्रेमाचे मंदिर आहे. परिस्थितीमुळे आम्ही रस्त्यावर आलो, पण त्याच वेळी देवदूताच्या रूपात संस्थेचे कार्यकर्ते आमच्यासाठी धावून आले. याची परतफेड कधी होऊ शकत नाही, हे सांगताना दीपा शेख या महिलेच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

स्नेहालयाच्या विद्यार्थी-पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी अनेक पालकांनी आपले अनुभव सांगत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास चव्हाण म्हणाले, मुलांची मानसिक, शारीरिक जडणघडण संस्कारातून घडते. यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. स्नेहालय हा अनाथ आर्शम नसून मुलांचे हक्काचे घर आहे.

प्रकल्प प्रमुख अनिल गावडे यांनी उन्हाळी सुटीमध्ये मुलांसाठी घेण्यात आलेले विकास शिबिर, आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन, योगा, उंची, संवर्धन वर्ग, संगणक प्रशिक्षण, क्रीडा शिबिर व अन्य विधायक उपक्रमांची माहिती दिली.

आरोग्य समन्वयक संजय चाबुकस्वार, डॉ. संजीव गडगे यांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक शरद जाधव यांनी, तर सूत्रसंचालन समाधान धालगुडे यांनी केले.