आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्राबाबू नायडूंचा आदर्श राज्यातील नेत्यांनी घ्यावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्रात जन्म झालेल्या अर्थक्रांतीचा राज्यातील एकाही पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश केलेला नाही. मात्र, आंध्र प्रदेशमधील तेलगू देशमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात अर्थक्रांतीच्या पाच प्रस्तावांचा समावेश केला आहे. चंद्राबाबूंचा आदर्श राज्यातील राजकारण्यांनी घेण्याची आवश्यकता ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक यमाजी मालकर यांनी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीने येथील सुयोग मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोकील, जनआंदोलनाचे सचिव अशोक सब्बन, प्रभाकर कोंढाळकर, भाऊराव साळवे, हेरंब कुलकर्णी, समीर इंदलकर, राज भोसले व राज्यभरातून आलेले 100 प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. अर्थशास्त्र हे पैशाचे शास्त्र नसून संसाधनाचे शास्त्र असल्याचे या वेळी बोकील म्हणाले.