आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ओबीसी मित्र पुरस्कार आंध्र प्रदेशातील राज्य सभेचे खासदार व्ही. हनुमंत राव यांना जाहीर झाला आहे. येथे होत असलेल्या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलनात 10 फेब्रुवारी रोजी समारोपाच्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
कर्नाटक ओबीसी फेडरेशनचे उपाध्यक्ष जे. के. सत्या यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, असेही श्री. उपरे यांनी सांगितले. पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी र्शी. राव यांच्या नावाची शिफारस केली होती. स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मागील वर्षी हा पुरस्कार चेन्नई येथील सी. करुणानिधी यांना मिळाला होता. केंद्र सरकारच्या केंद्रीय ओबीसी (इतर मागास वर्ग) फोरमचे श्री. राव निमंत्रक आहेत. श्री. राव ओबीसींच्या हितासाठी कार्यरत आहेत. राज्यसभेत ओबीसींच्या हक्काच्या मुद्दय़ांवर ते झगडणार्यांपैकी ते आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट या संस्थांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मिळण्यासाठी त्यांची भूमिका आग्रही होती.
ओबीसी जनगणना, कर्मचार्यांच्या पदोन्नतीत आरक्षण आदी विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यासाठी त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे श्री. उपरे यांनी स्पष्ट केले.
या वेळी स्वागताध्यक्ष युवराज चुंबळकर, संयोजन समिती सदस्य प्रा. राजन दीक्षित, डॉ. अशोक गायकवाड, नितीन जाधव आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.