आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाड्यांच्या खासगीकरणाला विरोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अंगणवाड्यांच्या खासगीकरणाला आमचा विरोध आहे. खासगीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे आश्वासन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शुक्रवारी दिले.

महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेतर्फे नक्षत्र लॉन येथे आयोजित मेळाव्यात वाकचौरे बोलत होते. ते म्हणाले, ही संघटना महिलांचे कल्याण साधणारी आहे. मदतनिसांना वेतन देण्याची मागणी दिल्लीपर्यंत मांडावी लागणार आहे. केंद्राच्या नव्या पेन्शनच्या योजना येणार आहेत. त्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. असंघटितांना 7 हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी मी यापूर्वीच दिल्ली येथे जंतरमंतरवर मांडली आहे. त्यानुसार शासनस्तरावर विचार सुरू आहे. एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या व दुर्धर आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांसाठी रुग्णालयापर्यंतचा प्रवास व उपचार मोफत करण्यात येणार आहेत, तशी योजना लवकरच जाहीर होईल.

अंगणवाडी मदतनिसांवर अनेक कामे सोपवली आहेत. त्यामुळे आता आहार आम्ही शिजवणार नाहीत, अशी भूमिका घ्यावी लागणार आहे, असे वाकचौरे म्हणाले.