आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी सेविकांची तहसीलसमोर निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी बुधवारी (22 जानेवारी) नेवासे तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. सुमारे 500 महिलांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

अंगणवाडी कृती समितीच्या आवाहनानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस 6 जानेवारीपासून संपावर गेल्या आहेत. प्रकल्पाचे खासगीकरण करू नये, वेतनर्शेणीचा लाभ द्यावा, निवृत्तीवेतन सुरू करावे, दिवाळीला एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून द्यावे आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपात अद्याप तडजोड झालेली नाही. त्यामुळे राज्यभर आंदोलने सुरू आहे.

कृती समितीच्या वतीने बुधवारी जीवन सुरुडे, शरद संसारे, मदिना शेख, बन्सी सातपुते, बाबा अरगडे, सुनीता गडाख, अंबादास कोरडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीवर अंगणवाडी सेविकांनी मोर्चाने जाऊन निदर्शने केली. निदर्शनात माया जाजू, मन्नाबी शेख, सविता दरंदले, प्रतिभा जोशी, नंदा राजगुरू, सविता दिवाकर, छाया डांगे, चंद्रकला विटेकर, हिरा देशमुख, अलका दरंदले, सुनीता घालमेले, नंदा जंगले, स्वाती हिवाळे, लक्ष्मी चव्हाण, कावेरी शिंदे, मीना धाकतोडे, भारती औटी आदी महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.