आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाचे रक्षण करणे हीच विघ्नहर्त्या गणरायाची खरी पूजा जिल्‍हाधिकारी अनिल कवडे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शाडूच्या मातीपासून स्वत:च्या हाताने गणेशमूर्ती तयार करून पर्यावरणाचे रक्षण करणे, हीच विघ्नहर्त्या गणरायाची खरी पूजा ठरेल, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी अनलि कवडे यांनी रविवारी केले.
कलाजगत न्यासाच्या वतीने सोमेश्वर लॉन्स येथे आयोजित गणपती बनवा कार्यशाळेत ते बोलत होते. शलि्पकार प्रमोद कांबळे यांनी या वेळी उपस्थितांना मूर्ती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. "कोहिनूर'चे प्रदीप गांधी, बाल कलावंत नहिार गिते, रसिक ग्रुपचे जयंत येलूलकर आदी या वेळी उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या कार्यशाळेत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांनी २५०० मूर्ती तयार केल्या. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शुभंकर कांबळे, मोना कांबळे, स्वाती कांबळे यांनी परशि्रम घेतले.
"अलायन्स'चा उपक्रम
अलायन्स क्लबच्या वतीने श्रमिकनगरमधील मार्कंडेय विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती बनवण्यात आले. शलि्पकार मेधा खिस्ती यांनी मार्गदर्शन केले. क्लबचे अध्यक्ष प्रवीण मुनोत, प्रदीप बार्शीकर, कविता जैन, कविता चुडविाल, मुख्याध्यापिका विद्या दगडे, शशिकांत गोरे, निर्मला घाटे, भारती गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. १५० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला.

समर्थमध्ये स्पर्धा
सावेडीतील समर्थ विद्यामंदिर प्रशालेत राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत इको फ्रेंडली गणपती स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या प्रारंभी मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी यांनी इको फ्रेंडली मूर्ती कशी बनवायची, याविषयी मार्गदर्शन केले. कलाध्यापक वविेक भारताल यांनी शाडू मातीचा गणपती बनवून तो कसा तयार करायचा, हे सांगितले. या स्पर्धेत ८१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. पर्यवेक्षिका संगीता जोशी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.