आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Pawar Get Hanging Punishment In The Case Of Ambika Dukare Murder

अंबिका डुकरेचा खुनी अनिल पवारला फाशीची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - नेवासे तालुक्यातील रस्तापूर येथील अंबिका डुकरेखून प्रकरणातील आरोपी अनिल जगन्नाथ पवार यास जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली.अहमदनगर महाविद्यालयात रखवालदार असलेल्या अनिलने 22 ऑक्टोबर 1995 रोजी नूतन माणिकराव हातिदास (झेंडीगेट) या महिलेचा बलात्कार करून खून केला होता. या प्रकरणात त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना 22 सप्टेंबर 2003 रोजी अनिल पॅरोलवर येरवडा तुरुंगातून बाहेर आला. मात्र, परत न जाता तो फरार झाला.
28 डिसेंबर 2004 रोजी त्याने राहता तालुक्यातील चितळी येथील महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. विरोध केल्याने तिला विहिरीत ढकलून तो पळून गेला. झाडाच्या फांदीला लटकल्यामुळे तिचे प्राण वाचले. या प्रकरणी अनिलवर गुन्हा दाखल झाला होता. नंतर अनिलने श्रीरामपूर येथील ज्योती नावाच्या महिलेशी विवाह केला. त्याचा सुगावा पोलिसांना लागल्याने तो बायकोसह रस्तापूर गावी पसार झाला. अंबिका डुकरे याच गावात राहात होती. 1 सप्टेंबर 2006 रोजी अनिलने तिच्यावर अत्याचार केला व डोक्यावर प्रहार करून तिचा खून केला. तसेच 13 ऑगस्ट 2008 रोजी डोºहाळे (ता.राहता) येथील जयश्री डांगे या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अनिलने तिचाही खून केला. घटनेनंतर नऊ दिवसांनी शिर्डी पोलिसांनी त्यास अटक केली होती.