आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राळेगणला फटाक्यांची आतषबाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सुटल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी राळेगणसिद्धी परिवाराने फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.

सक्षम लोकपाल व 15 मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीकरिता टीम अण्णाने नवी दिल्लीत उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी सायंकाळी अण्णांनी उपोषण सोडल्याने राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. संत यादवबाबा मंदिराच्या प्रांगणात जमा होऊन ग्रामस्थांनी गुलालाची मुक्त उधळण केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अण्णांनी उपोषण सोडावे, अशी विनंती गुरुवारीच राख्या पाठवून करण्यात आली होती.