आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराळेगणसिद्धी - सर्वत्र हिरवागार परिसर. नवे गेस्ट हाऊस. बाहेरच्या खोलीत भला मोठा सोफा सेट. आतमध्ये एक टेबल, खुर्ची, टीव्ही आणि पलंग. चकाकते पडदे, लाल भडक रंगाचा गालिचा आणि एअरकंडिशन. दरवाज्यावर मेटल डिटेक्टर. महाराष्टÑ पोलिसांच्या आठ जवानांचा 24 तास खडा पहारा. हा थाट कोणत्या मंत्र्यासाठी नव्हे, तर अण्णांची ती खास व्यवस्था आहे. त्यांच्या स्वराज हिंद ट्रस्टने ही व्यवस्था आकाराला आणली. अण्णांनी ज्या यादवबाबा मंदिरातील जुन्या खोलीत 40 वर्षे घालवली, तिथे आता त्यांचे कमी वास्तव्य असते. अण्णा आता व्हीआयपी झाले आहेत. आता त्यांची भेटही सहजासहजी होत नाही.
उपोषणानंतर अण्णा बर्याच वेळा मौनात असतात. उपोषणाचा थकवा आलाय. सुजलेल्या डोळ्यांतून तो स्पष्ट जाणवतो. सध्या ते आतमध्ये आहेत. बाहेर टीव्ही वाहिन्यांच्या ओबी व्हॅन उभ्या आहेत. हिंदी, इंग्रजी आणि मराठीचे दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील पत्रकार निळ्या बंद दरवाज्याकडे डोळे लावून बसले आहेत. कोणी मुलाखतीसाठी, तर कोणी टॉक शोसाठी. देशभरातून आलेले तरुण अण्णांसोबत छबी टिपण्याची इच्छा बाळगून आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, गेल्या दोन वर्षांत काय काय बदल झाले..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.