आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anna Cancels Proposed Hunger Strike On OROP, Land Acquisition Bill In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णांचे आंदोलन रद्द; केंद्राने वन रँक वन पेन्शनचा प्रश्न मार्गी लावल्याने निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - केंद्राने वन रँक वन पेन्शनचा प्रश्न मार्गी लावल्याने व भूमिअधिग्रहण कायद्यातील शेतकरी विरोधी जाचक अटी काढून टाकल्याने दोन ऑक्टोबरपासून दिल्लीत करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धीत दिली. केंद्राने २०१४ मध्ये नवीन भूसंपादन विधेयकात देशात कुठेही, कोणत्याही शेतकऱ्याची जमीन घेण्याचा अधिकार स्वत:कडे घेतला होता. हा शेतकरीविरोधी कायदा असल्याने आपण याला विरोध केला होता. तसेच सर्व माजी सैनिकांना समान धरून वन रँक वन पेन्शन द्यावी, अशी आपली मागणी होती. या प्रश्नांसाठी आपण दोन आॅक्टोबरला दिल्लीत रामलीला मैदानावर मोठे आंदोलन करण्याचेही निश्चित केले होते. त्याची तयारी सुरू होती. केंद्राने भूमिअधिग्रहण कायद्यातील जाचक अटी मागे घेतल्या. तसेच वन रँक वन पेन्शनलाही मान्यता दिली. यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करणार असल्याचे अण्णांनी सांगितले.